जळगाव- शहरातील भाऊसाहेब राऊत विद्यालयात शनिवारी शिक्षक-पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला़ मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी़आर कोळी तर प्रमुख अतिथी म्हणून रमेश सोनार, जयवंत पाटील, रेखा सोनवणे, संगीत कोळी, एल़एस़तायडे, एस़एस़अत्तरदे, वंदना बलसाने, ए़एस़बाविस्कर, एस़एम़रायसिंग यांची उपस्थिती होती.
मेळाव्यात गतवर्षाच्या अहवालाचे वाचन तुषार भोई यांनी केले़ प्रास्ताविक व सूत्रसंचालन समिती प्रमुख विनोदी कोळी यांनी केले़ तोच उपस्थित एस़एम़रायसिंग यांनी विविध विद्यार्थी योजनांची माहिती दिली़ अखेर मेळाव्याच्या शेवटी २०१८-१९ साठी शिक्षक पालक संघाची नुतन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली़ यात कल्याणी सोनवणे, कल्पना सोनवणे, माया ठाकरे, उषा कोळी, समाधान सोनवणे, भगवान सोनवणे, संगीता कोळी, रमेश सोनार, रेखा सोनवणे, नवल सोनवणे या पालकांची निवड करण्यात आली आहे़ आभार प्रदर्शन संगीता श्रिसाटे यांनी केले़ मेळाव्याला असंय पालक व शिक्षक उपस्थित होते़