भाऊ तोरसेकर, पोतदार, सरग, देशपांडे यांना देवर्षी नारद पुरस्कार जाहीर

0

पुणे : विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने देण्यात येणारा आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, व्यंगचित्रकार राजेंद्र सरग, युवा पुरस्कार पराग पोतदार, सोशल मिडिया पुरस्कार देविदास देशपांडे यांना जाहीर करण्यात आला आहे. 24 जुलै (सोमवार) फर्ग्युसन कॉलेजच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या हस्ते देण्यात येणार आहे, अशी माहिती डी.ई. सोसायटीचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी यांनी दिली.

या पुरस्काराचे हे सातवे वर्ष असून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या चार पत्रकारांचा देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी डॉ. शरद कुंटे, कार्यवाह रवींद्र घाटपांडे, उपाध्यक्ष अभय कुलकर्णी, संपादक मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते.