जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे राज्यशास्त्र या विषयात भागवत रामा वानखेडे यांना नुकातीच पीएच.डी.प्रदान करण्यात आली. कुलगुुरु प्रा.डॉ.पी.पी.पाटील यांच्याहस्ते त्यांना घोषणापत्र देण्यात आले. त्यांनी पीएच.डी.साठी ‘नागरिकांमध्ये माहितीच्या अधिकाराप्रती असलेल्या जागृकतेचा अभ्यास-विशेष संदर्भ जळगाव जिल्हा’ या विषयावर संशोधन केले.
डॉ.शुभांगी राठी यांचे मार्गदर्शन
वानखेडे यांना भुसावळच्या कोटेचा महिला महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.शुभांगी राठी यांचे मार्गदर्शन लाभले. भागवत वानखेडे यांनी पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल विद्यापीठ संशोधन विभागाचे विशेष कार्य अधिकारी प्रा.डॉ.पी.पी.माहुलीकर, परीक्षा व मुल्यमापन विभागाचे संचालक डॉ.धनंजय गुजराथी, आकाशवाणी केंद्राचे माजी केंद्र निर्देशक भगवान भटकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामा वानखेडे व मित्रपरिवाराने अभिनंदन केले आहे.