पुणे :- शास्त्र, कथा, पुराण, काव्य यांचे संकीर्तन म्हणजे भागवत आहे. भागवताचा भारतीय संस्कृतीशी अतिशय जवळचा संबंध असल्याने भागवत हा भारताच्या अध्यात्माचा आणि भक्तीसंस्कृतीचा आत्मा आहे. गीता आणि भागवताचे श्रवण प्रत्येकाने नित्यनियमाने करायला हवे, असे मत संतसाहित्याचे गाढे अभ्यासक विद्यावाचस्पती डॉ.रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
सदाशिव पेठेतील रेणुका स्वरुप मुलींच्या शाळेमध्ये पुणे आणि निनाद नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे श्रीमद् भागवत आनंदी जीवन अनुभूती सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन डॉ.देखणे यांच्या हस्ते झाले. सप्ताहाचे यंदा आठवे वर्ष आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, निरुपणकार प.पू.धनजंय देशपांडे, स्वामिनी साडी सेंटरचे आबूशेठ शेख, नावेद शेख, अविनाश बारपांडे, निनाद पुणेचे अध्यक्ष उदय जोशी, अमोल काळे, विरेंद्र कुंटे, राजकुमार नायडू, बाबा शिंदे, सुरेंद्र वाईकर, भावना वाईकर, किरण वाईकर, अलका वाईकर आदी मान्यवर उपस्थित होते.