भाजपकडून अरुण अडसड यांची उमेदवारी दाखल

0
विधानपरिषद पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
मुंबई : भाजप नेते व कृषिमंत्री दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी भाजपकडून धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथील माजी आमदार अरुण अडसड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार सोमवारी अरुण अडसड यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पोटनिवडणूक विरोधी पक्षाकडून कुठलाही उमेदवार न दिल्याने अडसड हे बिनविरोध निवडून येणार आहे.
सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार रिंगणात उतरविला नाही. त्यामुळे भाजपचे जेष्ठ नेते विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार असलेले अरुण अडसड यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी जाहीर केली. त्यानुसार अखेरच्या दिवस भाजपकडून अडसड यांचा एकाच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. यावेळी संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट,राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील,खासदार रामदास तडस,आमदार अनिल बोडे, भाई गिरकर, गिरीश व्यास यावेळी उपस्थित होते.