भाजपकडून ‘द अॅक्स्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा प्रचार !

0

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंह यांच्या जीवावर टीकात्मक भाष्य करणारा अनुपम खेर यांचा ‘द अॅक्स्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. संजय बरू यांनी लिहिलेल्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. दरम्यान भाजपने या चित्रपटाचा ट्रेलर पक्षाच्या अधिकृत ट्वीटरवरून शेअर केले आहे.

यावरून एकंदरीत हा चित्रपट भाजपच्या फेवरमध्ये असल्याची चर्चा होत आहे.

आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप या चित्रपटाचा फायदा घेत आहे. या चित्रपटात कॉंग्रेसच्या घराणेशाहीवर टीका करण्यात आली आहे. त्याचा प्रचार-प्रसार करत भाजप मतमिळविण्याचा प्रयत्न करत आहे.