भाजपकडून परिवर्तनाचे ‘हमीपत्र’

0

– स्टॅम्प पेपरवर प्रथमच जाहिरनामा प्रकाशित

मुंबई : भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी जाहीरनामा प्रकाशित केला. ‘हमी पारदर्शी कारभाराची, विकासाला साथ मुंबईकरांची’ असे घोषवाक्य असलेल्या जाहीरनाम्याचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जाहीरनामा प्रकाशित करताना भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी कुणी वचननामा, कुणी जाहीरनामा प्रकाशित करत आहे, असे सांगून शिवसेनेला टोला लगावला. विशेष म्हणजे भाजपने ‘स्टॅम्प पेपर’ असलेला हा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. मुंबईकरांच्या आपल्या शहराबद्दलच्या अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या असून, खर्‍या अर्थाने मुंबईकरांच्या मनातील जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे, असे शेलार यांनी यावेळी सांगितले. महापालिकेचा कारभार अधिक पारदर्शी करण्याचे भाजपचे स्वप्न आहे, असे सांगून महापालिकेतील सर्व नगरसेवक, अधिकारी, कंत्राटदार दरवर्षी आपले उत्पन्न जाहीर करणार आहेत, असेही यावेळी सांगितले.

भाजपने आपल्या जाहीरनामा ’हमी पारदर्शी कारभाराची, विकासाला साथ मुंबईकरांची’, अशा टायटल खाली प्रकाशित केला आहे. महापालिकेचा कारभार पारदर्शी करण्यावर जास्त भर देण्यात येईल, तसेच रस्ते खड्डेमुक्त होत नाहीत, तोपर्यंत मुंबईकरांकडून कोणताही कर आकारला जाणार नसल्याचे भाजपने प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. उल्लेखनिय म्हणजे, भाजपने ‘स्टॅम्प पेपर’वर आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे.

भाजपने प्रकाशित केलेल्या आपल्या जाहीरनाम्यात मुंबईकरांना अनेक आश्वासने देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचा कारभार अधिक पारदर्शी करण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही शेलार यांनी सांगितले. मुंबईकरांना २४ तास पाणी आणि मालमत्ता करात सूट देण्याचे प्रमुख आश्वासन भाजपने मुंबईकरांना दिले आहे. त्याचबरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक बांधण्याचे आश्वासन जाहीरनाम्यातून देण्यात आले आहे. रस्ते खड्डेमुक्त होईपर्यंत मुंबईकरांना कोणताही कर आकारला जाणार नाही, असे या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे. महापालिकेचा कारभार अधिक पारदर्शी करण्याचे भाजपचे स्वप्न आहे, असे सांगून महापालिकेतील सर्व नगरसेवक, अधिकारी, कंत्राटदार दरवर्षी आपले उत्पन्न जाहीर करणार आहेत, असेही यावेळी सांगितले.

भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे:
* बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधणार
* स्टॅम्प पेपरवर परिवर्तनाची हमी
* खड्डेमुक्त रस्ते होईपर्यंत कर लादणार नाही
* मालमत्ता करातून मुंबईकरांना सूट
* ‘राईट टू पी’ अंतर्गत महिला शौचालयांसाठी अर्थसंकल्पात अधिक तरतूद
* मलनिसाःरणाच्या पाण्यावर प्रक्रिया करणार
* ‘राईट टू म्युन्सिपल सर्व्हिस’ कायदा करणार
* सर्व नगरसेवक, अधिकारी, कंत्राटदार दरवर्षी संपत्ती जाहीर करणार
* महापालिकेत भ्रष्टाचार करणार्‍यांवर मोक्का लावणार
* मुंबईत जन्मलेल्या मुलीच्या बँक खात्यात ५ हजार रुपये जमा करणार
* मुंबईत पाच वैद्यकीय महाविद्यालये सुरु करणार
* ३० टक्के नैसर्गिक जमिनींचा वापर विकासासाठी करणार
* महापलिका शाळांतील विशेष विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा
* महापलिका शाळेच्या अभ्यासक्रमात बदल करणार, संयुक्त महाराष्ट्राचा धडा अभ्यासक्रमात
* लोकायुक्त आणि उप लोकायुक्त ही महत्त्वाची तरतूद
* मुंबईचे समुद्रकिनारे स्वच्छ करणार
* व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकारी मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार यासाठी प्रयत्न करणार
* ‘पीपीपी मॉडेल’ची पुन्हा चौकशी