मुंबई: राज्यात कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करता आलेले नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. एकीकडे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नेते शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत चर्चा करत असून दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदारांशी संवाद साधत आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रपती राजवट लागली तरी घाबरू नका, आपले सरकार स्थापन होणार आहे. माझ्याशी भाजपचे नेते अजूनही संपर्कात असून कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी देखील बोलणी सुरु असल्याचे मोठे विधान केले आहे.
शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी आमदारांशी संवाद साधताना सांगितले.