माधुरी दीक्षितला भाजपकडून खासदारकीची ऑफर!

0
मुंबई : मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी अभिनेत्री माधुरी दीक्षितची भेट घेऊन  भाजपकडून राज्यसभेची खासदारकीची ऑफर दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. माधुरीच्या मुंबईतील जुहू येथील घरी जाऊन अमित शहा यांनी माधुरीची भेट घेतली. शहा हे माधुरी दीक्षित यांची भेट घेणार आहेत, याविषयी कालपासूनच अंदाज लावले जात होते.
भाजपकडून जरी माधुरी दीक्षित यांना भाजप खासदारकीची ऑफर देण्यात आली असली, असं म्हटलं जात असलं, तरी माधुरी दीक्षित यावर नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. माधुरी दीक्षित यांची अमित शहा यांनी माधुरीच्या घरी जाऊन भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे हे देखील उपस्थित होते.
४ वर्षांच्या कारकिर्दीची स्तुती
भाजपकडून देशातील मान्यवर आणि प्रसिद्ध व्यक्तींना भाजप आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. माधुरी दीक्षितने काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४ वर्षांच्या कारकिर्दीची स्तुती केली होती. त्यामुळे शाह यांनी दीक्षित यांना ऑफर केल्याच्या चर्चेला आधार मिळत आहे. शाह यांनी याच अभियानातंर्गत भारताला क्रिकेटचा पहिला वर्ल्ड कप मिळवून देणारे कपिल देव यांची ही भेट घेतली होती. तेव्हाही या भेटीनंतर कपिल देव भाजपमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या येत होत्या. मात्र, देव यांनी त्याचे खंडन केले होते. आगामी काळात राज्यसभेत अनेक जागा रिक्त होणार असून, भाजपला काही प्रसिद्ध व्यक्तींची सध्या नितांत आवश्यकता आहे. त्यामुळेच भाजपकडून त्याची चाचपणी केली जात आहे.