भाजपकडून शेतकर्‍यांची थट्टा

0

योगी आदित्यनाथ सरकारवर अखिलेश यादवांचे टीकास्त्र

लखनऊ : उत्तर प्रदेशात भाजप सरकार कोणतीही कामे करून शकत नाही हे जनतेला समजले आहे. भाजपला मते देणार्‍या जनतेला आता पश्चाताप होत आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊ सांगत हे सरकार सहामहिन्यापूर्वी सत्तेत आले; परंतु, किरकोळ कर्जमाफी करून त्यांनी शेतकर्‍यांची थट्टा केली, असा आरोप माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर केला. समाजवादी पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते.

विकासाच्या योजना बंद केल्या
अखिलेश म्हणाले, निवडणुका आल्या की, जनतेला खोटी स्वप्न दाखविण्यासाठी नवा फॉर्म्युला घेऊन हे येतात. त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत. आमच्या सरकारच्या काळात आम्ही समाज हिताच्या योजना सुरू केल्या आणि भाजप सरकारने विकासाच्या योजना बंद केल्या. राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारने समाजवादी पेन्शन योजना बंद केली. मेट्रो आम्ही सुरू केली आणि ते म्हणतात हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे.

भाजपला मते देणार्‍यांना पश्चाताप
मुख्यमंत्री गोरखपूरचे आहेत. पण तिथेच सर्वाधिक बालमृत्यू झाले आहेत. उत्तर प्रदेशातील राजकारण खूपच महत्त्वाचे आहे. आता आपण सरकारमध्ये नाहीत. जनतेने भाजपला भरभरून मते दिली. समाजवादी पक्षालाही दिली. पण सत्तेत येऊ शकलो नाहीत. भाजपला मते देणार्‍या जनतेला आता पश्चाताप होत आहे. आपण कुणाला मते दिली याचा विचार मतदार करत आहेत. भाजप राज्यात कोणतीही विकासकामे करणार नाही हे त्यांना समजले आहे, असेही अखिलेश म्हणाले.