मुंबई: राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अधिकच वाढला आहे. राज्यपालांनी भाजपला मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. मात्र बहुमत नसल्याने भाजपकडून सत्ता स्थापनेला विलंब होत आहे. दरम्यान यावर चर्चा करण्यासाठी आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लवकरच कोअर कमिटीची दुसरी बैठक ४ वाजता होणार असून त्यानंतर जो निर्णय होईल तो माध्यमांना सांगितले जाणार असल्याचे सांगितले आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे सगळे आमदार रिट्रीट या हॉटेलमध्ये थांबून आहेत. त्याठिकाणी उद्धव ठाकरे यांनी आमदारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा आमदारांना पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे.