बीड-मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी नुसती घोषणाबाजी करते, घोषणाबाजी खूप मोठ-मोठ्या असतात, मात्र घोषणांची प्रत्यक्षात अमलबजावणी होत नाही. नुसती गाजर दाखविण्याचे काम हे सरकार करत असल्याचे सांगत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व मोदी सरकारवर टीका केली. घोषणांचे पाऊस बंद करा असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये जनसभेत ते बोलत होते.
राफेल पेक्षाही मोठा घोटाळा शेतकरी पिक विमा योजनेत झाला आहे. ‘देश बदल रहा हैं’, असे सांगतात मात्र प्रत्यक्षात काहीही बदल झालेला नाही. देशातील शेतकरी, सामान्य जनता अजूनही त्रस्त आहे असे उद्धव ठाकरेंनी लगावला. गेली साडेचार वर्ष चांगली कामगिरी करावी यासाठी या सरकारला साथ दिली मात्र या सरकारने काम केलेच नाही असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
मला शेतीतील कळत नाही असे आरोप माझ्यावर होते, शेतीतील भलेही मला कळत नसेल मात्र शेतकऱ्यांचे दु:ख मला कळते असे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.