भाजपचे कुंदन गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द

0
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत चिखली प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव असलेल्या जागेवर विजयी झालेले भाजपचे नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले आहे. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गायकवाड यांचे पद रद्द केले. त्यांना दिलेले सर्व लाभ वसूल केले जाणार आहेत.