मुंबई: धुळे येथील भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष लढली. त्यात त्यांचा पराभव झाला. दरम्यान आज गुरुवारी १२ रोजी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या जन्मदिनी त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे. आज दुपारी १२.३० वाजता अनिल गोटी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.
भाजप सोडल्यानंतर त्यांनी महापालिकेची निवडणूक देखील अपक्ष लढविली होती.