भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण !

0

पुणे :  मंत्री, आमदार, खासदारही आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. हडपसरमधील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. टिळेकर यांनी स्वतः माहिती दिली. त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दोनच दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारीणीत टिळेकर यांच्याकडे ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपद देण्यात आले आहे.

“दोन दिवसापूर्वी ताप आणि कणकण आल्याने माझी व मुलाची कोविड तपासणी करुन घेतली असता तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे.” असे आवाहन करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्वीटरवर दिली.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली. मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. शनिवारी (4 जुलै) सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत महापौरांसह पाच नगरसेवकांना आणि एका उपायुक्तांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र उर्वरित चारही नगरसेवक कोरोनामुक्त झाले आहेत.