भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ अनंतात विलीन !

0

अमळनेर: भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे काल गुरुवारी सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. आज त्यांच्यावर मुळगावी डांगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, माजी आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार शरद पाटील, वाल्मिक पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाभरातून भाजपचे नेते, कार्यकर्ते तसेच सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. काल सकाळी अमळनेर येथील राहत्या घरी अंघोळ करतानाच उदय वाघ यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्यांचे निधन झाले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शोक व्यक्त केला आहे.

उदय वाघ यांनी चार वर्षे भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी गावागावात पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केले. अभाविपपासून ते राजकारणात सक्रीय होते.