पुणे । पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या ६७व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘बेटी बचावो बेटी पढायो’ उपक्रम तसेच शहर भाजप अध्यक्षा उषा वाचपे ह्यांच्या वतीने जंगली महाराज रस्ता येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात खासदार अनिल शिरोळे सहभागी झाले होते.
याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, श्याम सातपुते आदी उपस्थित होते. मार्केट यार्ड येथील शिवाजी पुतळा येथे भाजप झोपडपट्टी आघाडीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ह्या अभियानात पालिका गटनेते श्रीनाथ भीमाले, किरण वैष्णव, संग्रामसिंह टाक, जीवन माने, सागर टाक आदी सहभागी झाले होते.