पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड भाजपच्या अनुसूचित महिला मोर्चा अध्यक्षपदी कोमल शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्याहस्ते शिंदे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर प्रवक्ते अमोल थोरात, युवा नेते अमित गोरखे, सरचिटणीस, प्रमोद निसळ, माजी महापौर आर.एस. कुमार उपस्थित होते. कोमल शिंदे यांचे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची नियुक्ती करण्यात आले आहे. तसेच, पथनाट्यातून समाज जागृतीसाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.