नवी दिल्ली- भाजप सरकार सत्तेत आल्यापासून अनेक शहरे, तीर्थक्षेत्रांची नावे बदलण्यात आलेली आहे. दरम्यान आता मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी चक्क एका मंत्रालयाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. भूविज्ञान (पृथ्वी विज्ञान मंत्रालय) मंत्रालयाचे नाव बदलून भारत माता मंत्रालय करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या १४४ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते, त्यावेळी त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. हवामान विभागाचे सचिव एम राजीवन यांना जर आक्षेप नसेल तर भारत माता मंत्रालय नाव ठेवण्यात काहीच गैर नाही असे ते म्हणाले.