जळगाव: केंद्रीय मंत्री भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी जळगाव भाजप जिल्हा अध्यक्ष यांची निवड प्रक्रिया झाली. यात माजी आमदार हरिभाऊ जावळे यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.अत्यंत गोंधळात ही प्रक्रिया पार पडली. 18 पैकी 17 जणांनी माघार घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शहरातील बाबा हरदासराम मंगल कार्यालयात भाजपची बैठक झाली. याप्रसंगी माजी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार हरीभाऊ जावळे, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदूलाल पटेल, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, किशोर काळकर आदींची उपस्थिती होती.