राज ठाकरे यांनी ट्वीटरवरून भाजपची अशी उडवली खिल्ली

0

मुंबई-कर्नाटकमध्ये जनता दल सेक्यूलर आणि काँग्रेस युतीने भाजपाला दणका दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपाला फटकारले आहे. ‘घशात हात घालून सत्ता बाहेर काढली!’ असे या व्यंगचित्रात म्हटले आहे.

व्यंग चित्रातून टीका 

कर्नाटक विधानसभेत शनिवारी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बहुमत चाचणी घेण्यात आली. यात बहुमत सिद्ध करण्यात अपयश येत असल्याचे लक्षात येताच भाजपाच्या येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. भाजपा हा १०४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. पण काँग्रेस व जनता दल सेक्यूलर या पक्षांनी निवडणुकोत्तर युती करत भाजपाच्या मार्गात अडथळे आणले.

कर्नाटकमधील जनता दल सेक्युलर- काँग्रेस सरकारचा शपथविधी बुधवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकमधील घडामोडींवर व्यंगचित्र रेखाटले आहे. या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी काँग्रेस, कुमार स्वामी आणि अमित शहा या तिघांना दाखवले आहे. काँग्रेसने भाजपाच्या घशात हात घालून सत्ता बाहेर काढली, असा चिमटा राज ठाकरेंनी या व्यंगचित्रातून काढला आहे.