पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या दृष्टीने नको असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे सत्रच राज्य सरकारने चालू ठेवले असून अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांची बदली हा त्याच मालिकेतील एक भाग म्हणून मानली जात आहे.
महापालिकेच्या कारभारात भाजप नगरसेवक आणि शीतल उगले यांच्यात अनेक वेळा संघर्ष उदभवले. त्याचा परिणाम होऊन नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेऊन त्यांच्या बदलीची मागणी केली होती. सुमारे ऐंशी नगरसेवकांची ही मागणी होती. अखेरीस गुरुवारी राज्य शासनाने नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी उगले यांची बदली केली. यापूर्वी प्रेरणा देशभ्रतार यांचीही बदली नगरसेवकांच्या मागणीवरूनच करण्यात आली होती. पुणे परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदावरून तुकाराम मुंडे यांचीही बदली तडकाफडकी करण्यात आली होती.