नव्या वर्षातील महासभेची तहकुबीनेच सुरूवात
भाजपने केला खेळखंडोबा : विरोधी पक्षनेत्यांचा आरोप
पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आपल्या दोन वर्षाच्या राजवटीत सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा विक्रम केला आहे. आजपर्यंत तब्बल 29 वेळा महासभा तहकूब केल्या आहेत. 2019 या नवीन वर्षातील महासभेची तहकुबीने सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजपने महासभेचा खेळखंडोबा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला.
सत्तेनंतरची पहिलीच सभा तहकूब
शहरातील विकासकामांचे नियोजन करणे. त्यावर सांगोपांग चर्चा करण्यासाठी महिन्यातून एकदा महासभेचे आयोजन केले जाते. परंतु, सत्ताधारी भाजपने गेल्या दोन वर्षात तब्बल 29 वेळा महासभा तहकूब करण्याचा विक्रम केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन फेब्रुवारी 2017 मध्ये भाजपची एकहाती सत्ता आली. सत्तांतर झाल्यानंतर महापौर निवडण्यासाठी 14 मार्च 2017 रोजी पहिली महासभा झाली. नियमाप्रमाणे पहिली महासभा तहकूब करण्यात आली. परंतु, त्यानंतर वारंवार सभा तहकूब करण्याचा सपाटाच सत्ताधार्यांनी लावला.
तहकूब, तहकूब आणि तहकूब
??20 जून 2017 ची महासभा तहकूब केली. 20 सप्टेंबर 2017 ची महासभा 16 ऑक्टो बर 2017 पर्यंत तहकूब करण्यात आली. 20 नोव्हेंबर 2017 ची महासभा 28 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली. 20 डिसेंबर 2017 ची महासभा दोनदा तहकूब करण्यात आली. 20 जानेवारी 2018 आणि 5 फेब्रुवारी 2018 अशी दोनवेळा तहकूब करण्यात आली होती. तर, 20 जानेवारी 2018 ची महासभा 5 फेब्रुवारी 2018 पर्यंत तहकूब केली होती. 20 फेब्रुवारी 2018 ची महासभा दोनवेळा तहकूब केली होती. अर्थसंकल्पाची सभा तर सत्ताधार्यांनी तब्बल सहा वेळ तहकूब केली होती. त्यानंतर 19 मे 2018 ची महासभा पहिल्यांदा 11 जून आणि दुसर्यांदा 20 जूनपर्यंत आणि आता ही सभा 22 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. तहकूब केली. अशाप्रकारे भाजपने 20 वेळा महासभा तहकूब केल्या आहेत. सव्वा वर्षात 188 ठराव करण्यात आले आहेत. मे महिन्याची सर्वसाधारण सभा सलग तीन वेळा कोणतेही सबळ कारण न देता तहकूब केली आहे. 19 मे 2018 ची महासभा पहिल्यांदा 11 जून आणि दुसर्यांदा 20 जूनपर्यंत तहकूब केली. त्यानंतर 20 जून रोजी पुन्हा 22 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.? 20 जुलैची सभा अर्ध्या तासाकरिता तहकूब करण्यात आली. 20 ऑगस्टची मासिक सभा 6 सप्टेबरपर्यंत तर19 सप्टेंबरची मासिक सभा त्याचदिवशी दुपारी पाच मिनिंटांकरिता तहकूब करण्यात आली. तीच तहकूब सभा 27 सप्टेंबरला आयोजित करण्यात आली. मात्र. ही सभादेखील तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत तहकूब करण्यात आली. याशिवाय 20 ऑक्टोबरची सभा 31 ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली. 20 नोव्हेंबरची सभा महिनाभरासाठी म्हणेजच 20 डिसेंबरसाठी तहकूब करण्यात आली. तर 20 डिसेंबरची तहकूब सभा त्याचदिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. तर आजची (दि.19 जानेवारी) ची सभा 4 फेब्रुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. अशा प्रकारे गेल्या दोन वर्षाच्या राजवटीत भाजपने तब्बल 29 वेळा महासभा तहकूब केली आहे.
विषय विनाचर्चा मंजुरीसाठी डाव
सत्ताधार्यांनी महासभा तहकुबीचा पायंडा चांगला जपला आहे. आहे. किरकोळ कारणे पुढे करत वारंवार महासभा तहकूब केली जात आहे. यामुळे शहराच्या विकासाला खिळ बसत आहे. वारंवार सभा तहकूब होत असल्याने महासभेत शहरातील विकास कामांवर चर्चा होत नाही. एकापाठोपाठ एक महासभा तहकूब करून विषयांची साठवणूक करायची आणि अनेक विषय एकाच महासभेत ठेऊन विनाचर्चा मंजूर करून घ्यायचे हा महापालिकेची प्रथा बनली आहे. अशावेळी विषयांच्या गर्दीत अनेक वादग्रस्त प्रकरणेदेखील विनाचर्चा मंजूर केली जातात.
कोट
सत्ताधार्यांच्या अशा बेजबाबदार वर्तणुकीमुळे शहराच्या विकासाला खीळ बसत आहे. सत्ताधारी घाबरत असल्याने सातत्याने महासभा तहकूब केली जात आहे. तसेच राष्ट्रवादीची सत्ता असताना सभा तहकूब केली की भाजपचे नगरसेवक आरोप करत होते. आता स्वत: वारंवार सभा तहकूब करत आहेत.
दत्ता साने, विरोधी पक्षनेते