रातानाडा- येथील भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष जेठू सिंह यांच्या भावाच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच एक तरुण आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जेठू सिंह यांचे भाऊ गजेंद्र सिंह आज पहाटे ४ वाजता अज्ञातांनी हल्ला केला. घटनेची चौकशी सुरु आहे. जेठू सिंह यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली नव्हती यामुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यासोबत पूर्ण मंडळाने सामुहिक राजीनामे दिले होते.