भाजपच्या माया कोडनानी दोषमुक्त

0

नरोडा पाटिया नरसंहार प्रकरण
बाबू बजरंगीला मात्र मरेपर्यंत जन्मठेप

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोषमुक्त करून दोषी ठरलेल्या भाजपच्या माजी आमदार माया कोडनानी यांनाही शुक्रवारी न्यायालयाने दोषमुक्त केले. गुजरातमधील बहुचर्चित नरोडा पाटिया नरसंहारा प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी हा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील दोषींनी विशेष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. यामध्ये कोडनानी यांना दोषमुक्त केले असले तरी बजरंग दलाचा नेता बाबू बजरंगी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

कोडनानी होत्या मोदी सरकारमध्ये मंत्री
आता गुजरात उच्च न्यायालय इतर दोषींची शिक्षा कायम ठेवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दंगल झाली तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. अहमदाबाद शहराच्या सीमेवर असलेल्या नरोडा पाटिया उपनगरात गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीत 97 मुस्लिमांचा मृत्यू झाला होता. नरोडा येथून तीन वेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या कोडनानी या मोदी सरकारमध्ये मंत्री होत्या. या प्रकरणी ऑगस्ट 2012 मध्ये विशेष न्यायालयाने कोडनानी, बाबू बजरंगीसह 32 जणांना दोषी ठरवले होते.