कोलकाता-पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या रथयात्रेला उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. भाजपला रथयात्रेला परवानगी मिळू नये यासाठी ममता बॅनर्जी सरकार खटाटोप करत आहे. सुरुवातील परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र भाजपने याला उच्च न्यायालयात आव्हान देत परवानगी मिळविली. दरम्यान ममता बॅनर्जी सरकारने पुन्हा याचिका दाखल केली असून यावर आज सुनावणी होणार आहे.
भाजप पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढणार आहे. त्यावरून सध्या भाजप व तृणमूल कॉंग्रेसमध्ये वाद सुरु झाले.