भाजपच्या रम्याचा शरद पवार, आव्हाडांना डोस !

0

मुंबई: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहे. दरम्यान आज भाजपने रम्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना लक्ष केले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचे कन्हैय्या कुमार उपस्थित होते यावरून भाजपने शरद पवारांना टोला लगावला आहे.

कन्हैय्या कुमारला सोबत घेऊन फिरल्याने काल आपला होत नाही असे म्हणत शरद पवारांना तर गीतेतल्या श्लोकाचे उच्चार स्पष्ट होतात असेही म्हणत जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मोठा गाजावाजा करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले मात्र वेळ संपल्याने त्यांना माघारी यावे लागले. चिन्ह घड्याळ असले आणि सोबत कन्हैय्या नाव असलेली व्यक्ती असली की यांना वाटते, काळ यांच्यासोबत आहे. पण शेवटी काळाच्या मनात जे आहे तेच होणार. पण यांच्या बेसिकमध्येच लोचा आहे…’यदा यदासी धर्मस्य’ अशा शब्दात भाजपने जितेंद्र आव्हाडांना टोला हाणला आहे.