भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट !

0

मुंबई: भाजपच्या शिष्टमंडळाने आज मंगळवारी दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. राजभवनात जाऊन भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार पूनम महाजन, आमदार सुनील राणे, अतुल भातखळकर यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. भेटी मागचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. बहुदा एनआरसी आणि सीएए कायद्याच्या समर्थनार्थ ही भेट घेतली असावी असा अंदाज आहे.