भाजपतर्फे कर्नाटक विधानसभा अध्यक्षपदासाठी सुरेशकुमार यांचा उमेदवारी अर्ज

0

बंगळूर-कर्नाटकचे २६ वे मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामी यांनी काल शपथ घेतली. आज ते विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहे. तत्पूर्वी विधान सभा अध्यक्षाची निवड करावी लागणार आहे. कॉंग्रेसचे केआर रमेश कुमार यांचे नाव कॉंग्रेस-जेडीएसतर्फे विधानसभा अध्यक्ष पदासाठी निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान भाजपचे विनोद सुरेशकुमार यांनी आज विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या सोबत व्ही सुनील कुमार आणि अश्विथ नारायण उपस्थित होते.