भाजपतर्फे मजुरी करणाऱ्या कुटुंबियांना अन्नदान

0

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साबण व मास्कचेही वाटप,आ.स्मिता वाघांच्या सहकार्याने उपक्रम

अमळनेर-कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आलेल्या बेरोजगारीच्या संकटात भारतीय जनता पार्टीने संपुर्ण राज्यात मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या कुटुंबियांना मदतीचा उपक्रम सुरू केल्याने अमळनेर तालुक्यात देखील आ.स्मिता वाघांच्या मार्गदर्शनाने भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा तर्फे फूड पॅकेट तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साबण व मास्क वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
आजच्या आपत्कालीन परिस्थितीत ज्या मोलमजुरी करणाऱ्या लोकाना खायला नाही अश्याना जेवण मिळावे म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांनी महाराष्ट्र ची आपत्कालीन बैठक घेतली. त्याअनुषंगाने अमळनेर ला आमदार स्मिता वाघ यांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाने तात्काळ नियोजन करून साधन सामुग्री उपलब्ध केली.त्यानुसार विविध वस्त्याध्ये प्रत्यक्ष जाऊन फूड पाकीट वाटप करण्यात आले तसेच तोंडाला लावण्याचे माक्स व हात धुण्यासाठी साबण वाटप करण्यात आले.यावेळी आ स्मिता वाघही उपस्थित होत्या.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष उमेश वाल्हे,सरचिटणीस राकेश पाटील, बबलू राजपूत,उपाध्यक्ष महेंद्र महाजन, चंद्रकांत कंखरे, चिटणीस देवा लांडगे,युवा मोर्चा योगीराज चव्हाण,पंकज भोई,राहुल चौधरी,आयज बागवान,समाधान पाटील,शिवाजी राजपूत,प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील चौधरी,चेतन चौधरी,अभिषेक पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.