भाजपने घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

0

नवापूर । शहरातील अग्रवाल भवनात भाजपच्या नगर परिषदेच्या निवडणूकीकरीता इच्छुक असलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. खासदार तथा भाजपा जिल्हा अध्यक्षा डॉ.हिना गावित, आमदार डॉ.विजयकुमार गावित, सुधीर पाडवी, डॉ.कांतीलाल ताटीया, एजाज शेख, अनिल वसावे, निलेश प्रजापती, कमलेश छत्रीवाला, राकेश सैन, जाकिर पठाण उपस्थित होते.

काँग्रेसचे उमेदवार भाजपकडून इच्छुक
नगराध्यक्ष पदासाठी 5 तर 10 प्रभागामधुन 78 उमेदवारांनी मुलाखत दिली. नवापूर नगरपालिकेतील विद्यमान काँग्रेसचे एका नगरसेवक प्रभाग क्रमांक एक मधून मागणी केली आहे. तर ज्योती जयस्वाल यांनी भाजपाकडून इच्छुक उमेदवारी अर्ज भरून मुलाखती दिल्याने शहरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. नगरसेविका ज्योती जयस्वाल यांनी स्वतःचा काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी अर्ज न मागता भाजपाकडून मागणी केली आहे.ज्योती जयस्वाल यांनी नगराध्यक्षा पदासाठी भाजपाकडून इच्छुक उमेदवारी अर्ज भरून मुलाखत दिली आहे.

नावाची घोषणा नाही
काँग्रेस पक्षाने सर्व इच्छुक उमेदवारांची माहिती प्रसार माध्यांना दिली होती. परंतू सत्ताधारी भाजपाने काही इच्छुक उमेदवारी यांचे जाहिर न करता गोपनीय म्हणून दिली आहे. यात भाजपाची कार्यकर्त्यां मध्ये राजकीय खेळी करून निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विश्वासघात होणार तर नाहीना असा प्रश्न उपस्थित होत आहे. शैलाताई टीभे, ज्योतीताई जयस्वाल, विद्युल्लता पाटील, चांदनी महेता आदींनी नगराध्यक्षपदासाठी मुलाखत दिली.