पुणे : आज पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. यावेळी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना भाजपने दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे त्यांना संघर्ष करावा लागला असे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला विकास करण्याबाबत शब्द दिला आहे. हा शब्द ते पाळतील. कारण भाजपने शब्द पाळला नाही म्हणून ते दु:खी झाले आणि त्यांना संघर्ष करावा लागला. त्यामुळेच ते जनतेला दिलेला शब्द नक्की पाळतील असा विश्वास असल्याचे शरद पवारांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील भाषण केले. महाविकास आघाडीचे सरकार हे पवारांचा चमत्कार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.