नवी दिल्ली- दिल्लीतील स्वच्छता कामगारांनी गेल्या काही दिवसांपासून वेतन मिळत नसल्याने आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर प्रदर्शन केले. दरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल यांनी यासाठी भाजपला दोषी ठरविले आहे. भाजपमुळे दिल्लीतील स्वच्छता व्यवस्था बिघडली आहे असे आरोप केजरीवाल यांनी केले आहे. ट्वीटरवरून त्यांनी भाजपवर निशाना साधला आहे.
दिल्ली की सफ़ाई व्यवस्था को लेकर मैं बेहद चिंतित हूँ। भाजपा की केंद्र और MCD की सरकारों ने दिल्ली की सफ़ाई व्यवस्था को पूरी तरह अस्त व्यस्त कर दिया है
मैं अपने सफ़ाई कर्मचारियों को लेकर भी बेहद चिंतित हूँ। हर दो महीनों में इनको अपनी तनख़्वाह लेने के लिए हड़ताल करनी पड़ती है https://t.co/8OhN8NqsMf
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 4, 2018
मी दिल्लीतील स्वच्छता व्यवस्थेमुळे चिंतीत आहे. भाजपच्या केंद्र सरकार आणि एमसीडी ने दिल्लीतील स्वच्छता व्यवस्था बिघडवीली आहे. गेल्या दोन महिन्यापासून कामगारांचे पगार दिलेले नाही. त्यामुळे कामगार संतापले आहे. मात्र मी कामगारांमध्ये जाऊन सत्यता काय आहे हे दाखवून देणार आहे. भाजपचा खरा चेहरा मी कामगार आणि जनतेसमोर आणणार आहे असे केजरीवाल यांनी सांगितले आहे.
सफ़ाई कर्मचारी मेरे घर के बाहर प्रदर्शन कर रहे हैं। उन्हें भाजपा ने झूठ बोलकर बरगलाया है। मैं उनसे सीधे बात करने उनके बीच जा रहा हूँ। उनको सच बताऊँगा। सारे तथ्य उनके और दिल्ली की जनता के सामने रखूँगा।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 4, 2018