वेगळा पक्ष काढणार नाहीत!
मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेसविरोधात बंड करून आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना आपल्या स्वतंत्र समर्थ विकास पॅनेलने सामोरे जाण्याचा निर्णय घेणारे राणे वेगळा पक्ष काढतील,अशी चर्चा होती. मात्र या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला असून स्वतंत्र पक्ष काढणे सोपे नसल्याने राणेंनी हा निर्णय घेतला असून भाजप मंत्रीमंडळात मिळेल ते पद घेण्याचा त्यांचा विचार आहे. 5 आॅक्टोबरनंतर मंत्रीमंडळ विस्ताराची अपेक्षा असून यावेळी राणेंना पक्षात घेतले जाईल, अशी मािहती भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी दिली.
राणेंचे राजकीय भविष्य काय? सध्या सातत्याने चर्चा सुरू आहेत. कोकणात रायगड, रत्नािगरी व सिंधुदुर्ग अशा तीन जिल्ह्यात मिळून िशवसेनेचे 7, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शेतकरी कामगार पक्षाचे 2, तर काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी 1 आमदार आहेत.कोकणात 15 पैकी फक्त एक आमदार भाजपचा असावा, याची सल सत्ताधाऱ्यांच्या मनात आहे. राणेंसारखा अनुभवी नेता भाजपमध्ये आल्यास पक्षाची ताकद वाढेल, असे आम्हाला वाटते. मात्र त्यांना आमच्या अटीवर पक्षात घेतले जाईल, ते काय म्हणतात, याचा पक्ष विचार करणार नाही. पक्षश्रेष्ठींनी याविषयी स्पष्ट भूमिका घेतल्याचे या वरीष्ठ मंत्र्याने सांगितले.