भाजपला आणखी मोठा धक्का; खडसेंपाठोपाठ माजी मंत्री गायकवाड राष्ट्रवादीत

0

मुंबई: माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपला सोडल्यानंतर भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री मराठवाड्यातील मोठे नेते जयसिंग गायकवाड यांनी आज मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. बीड जिल्ह्यातील मोठे नेते म्हणून गायकवाड यांची ओळख होती. केंद्रात त्यांनी मंत्रीपद भूषविले आहे. भाजपकडून ते खासदार म्हणून संसदेत निवडून गेले होते. मात्र पदवीधर निवडणुकीत उमेदवारी दिली नसल्याने त्यांनी भाजपला रामराम ठोकत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.