भाजपला आयात नेत्यांची झाली डोकेदुखी

0

मुंबई । सध्या भारतीय जनता पक्ष आयात नेत्यांच्या कारनाम्यांमुळे त्रस्त झआला आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती तोडली मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी 55 उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या पक्षातून आयात केले. सत्तेत आल्यानंतर यातल्याच काहींनी भाजपला चांगलेच अडचणीत आणले आहे. सत्तेवर आल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे या नेत्यांनी भाजपला अडचणीत आणले असून त्यामुळे भाजप त्रस्त आहे.

आमदार शिवाजी कर्डिले, उपमहोपौर श्रीपाद छिंदम, आमदार प्रशांत परिचारक, आमदार प्रविण दरेकर आणि डॉ. विजयकुमार गावित यांची प्रकरणे निस्तारताना भाजप नेत्यांच्या नाकी नऊ आले आहेत. कर्डिलेंना अहमदनगरच्या दुहेरी हत्याकांडात खुनाचा कट रचणे आणि एसपी कार्यालय फोडण्याचा गुन्ह्यात त्यांना आज अटक करण्यात आली.फेब्रुवारीत अहमदनगरमध्ये उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका फोन संभाषणात अपशब्द वापरल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली. परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबाबत अपमानजनक वक्तव्य केले. यामुळे देशभरात टीकेची झोड उठली. राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेले डॉ. विजय कुमार गावित यांचा आदिवासी घोटाळा असो किंवा मनसेतून आलेले प्रवीण दरेकर यांचा मुंबै बँक घोटाळा, या अशा आयात नेत्यांची प्रकरणं अधून-मधून चर्चेचा विषय असतात.