भाजपला बसणार धक्का; १२ आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात !

0

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासहित ६ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. विश्वासदर्शक ठराव देखील १६९ मतांनी महाविकास आघाडीने जिंकले आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसमधून भाजपात गेलेले आमदार पुन्हा परतणार असल्याचे वृत्त इकोनॉमिक टाईमने दिले आहे. तब्बल १२ आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा महाविकास आघाडीत प्रवेश होईल असा दावा करण्यात आला आहे. महाविकास आघाडीत प्रवेश केल्यानंतर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविण्याची तयारी आमदारांनी सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडीचे सरकार आल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादीतून गेलेल्या नेत्यांना पुन्हा परत येण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. भाजपने अनेक दिग्गज नेत्यांना तिकीट नाकारल्याने आणि काही नेत्यांना अंतर्गत कुरघोडीने पाडण्यात आल्यानेही नेते नाराज आहेत. नाराज नेते देखील भाजपला सोडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यात पंकजा मुंडे, एकनाथराव खडसे यांचे नाव समोर येत आहे.