हरिद्वार: लोकसभा निवडणूक सुरु असून सरकारला विविध मुद्द्यावरून विरोध होत आहे. यात शेतकरी आत्महत्येचा मुद्दा गंभीर असतांना उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील डाडकी गावातील एका शेतकऱ्याने भाजपला मतदान करू नका अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. पोलिसांना ही चिठ्ठी सापडल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. इश्वर चंदन शर्मा (६५)असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सोमवारी पहाटेच्या सुमारस इश्वर शर्माने वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली. या शेतकऱ्याला रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. त्याने आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठ्मध्ये, ‘मागील पाच वर्षात भाजपाने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले आहे. भाजपाला मतदान करु नका नाहीतर ते सर्वांना चहा विकायला लावतील,’ असे म्हटले आहे.
‘एका मध्यस्थीच्या मदतीने मला पाच लाखांचे कर्ज मिळाले. मात्र त्यानंतर ही व्यक्ती मुदत पूर्ण होण्याआधीच मला पैश्यांसाठी त्रास देऊ लागल्याचे शर्मांनी आपल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. कर्ज घेताना शर्मा यांनी या मध्यस्थी राहिलेल्या व्यक्तीने गॅरेंटर म्हणून सही केल्यामुळे त्याला सही केलेला ब्लँक चेक दिला होता. मात्र बँकेला पैसे वेळेत परत केल्यानंतरही ही व्यक्ती त्या चेकचा वापर करण्याची धमकी शर्मा यांना देत होती. शेतमाल विकून बँकेत टाकलेले सर्व पैसे मी काढून घेईल अशी धमकी या व्यक्तीने मला दिली होती, असं शर्मांनी त्या व्यक्तीचं नाव न घेता आत्महत्येच्या चिठ्ठीत म्हटले आहे.