भाजपला मदत करण्यासाठी वंचित आघाडी निवडणुकीच्या रिंगणात : जयंत पाटील

0

जळगाव- बहुजन वंचित आघाडी हा पक्ष भाजपची ‘बी’ टीम म्हणून काम करत असून भाजपला मदत करण्याच्या उद्देशानेच बहुजन वंचित आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. ते आज आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना बोलत होते. आघाडीचे मतविभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला व्हावा या उद्देशाने बहुजन वंचित आघाडी लोकसभेची निवडणूक लढवीत आहे, मात्र जनता ही खूप सूज्ञ आहे बहुजन वंचित आघाडीचा हा उद्देश ते सफल होऊ देणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार गुलाबराव देवकर, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार डॉ.सतीश पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.