जळगाव- भारतीय जनता पक्षाचा 40 वा स्थापनादिन साजरा करण्यात आला. आमदार राजूमामा भोळे यांनी ध्वजारोहण केले. महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांनी पंडित दिनदयाल आणि डॉ.शामा प्रसाद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सरचिटणीस विशाल त्रिपाठी,नितीन इंगळे,राजेंद्र मराठे,प्रकाश पंडित,गणेश माळी,दिनेश पुरोहित,संजय शिंदे,निलेश पवार,शांताराम गावंडे,गणेश पाटील आदी उपस्थित होते. त्यानंतर भाजपच्या 9 मंडल पदाधिकार्यांनी गरजूना अन्नदान केले. दरम्यान,महापौर भारती सोनवणे,कैलास सोनवणे यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्यांनी आपआपल्या निवासस्थानी भाजप पक्षाचा ध्वज लावून स्थापना दिन साजरा केला.