भुसावळ विभागात भाजपाचे आमदार निलंबन निषेधार्थ आंदोलन

वरणगावात पदाधिकार्‍यांनी रोखला रस्ता तर भुसावळात पदाधिकार्‍यांची निदर्शने व रावेरात प्रशासनाला निवेदन

भुसावळ : पावसाळी अधिवेनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षण मुद्यावरून झालेल्या रणकंदनानंतर भाजपाच्या 12 आमदारांना वर्षभरासाठी निलंबीत करण्यात आल्याच्या निषेधार्थ भुसावळातील स्थानिक पदाधिकार्‍यांनी यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने केली तर वरणगावात पदाधिकार्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले तसेच रावेरात प्रशासनाला निवेदन देण्यात आले. तालिबानी पद्धतीने, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचे निलंबन करण्यात आल्याने आघाडी सरकारविरोधात भुसावळ विभागात पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

भुसावळ प्रांताधिकार्‍यांना निवेदन
भाजपा पदाधिकार्‍यांनी आमदार निलंबनाचा निषेध करीत पायी मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर नेत प्रशासनाला निवेदन दिले. निदर्शन आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, जिल्हा चिटणीस शैलजा पाटील, कायदे आघाडी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश पाटील, शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, अमोल महाजन, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, प्रा.दिनेश राठी, गिरीश महाजन, खुशाल जोशी, राजु खरारे, बिसन गोहर, जयंतीलाल सुराणा, चंद्रशेखर इंगळे, संजय बोचरे, मुकंदा निमसे, पवन बुंदेले, मनोज पिंपळे, प्रवीण इखणकर, रवी दाभाडे, चेतन बोरोले, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी, नंदकिशोर बडगुजर, चेतन बोरोले, गोपीसिंग राजपूत, राहुल मेहरानी , लखन रणधीर, नागेश खरारे, प्रशांत भट, प्रणव डोलारेे, लोकेश जोशी, अक्षय जाधव, मयुर सावकारे आदींचा सहभाग होता.