भाजपाचे कमळ अंतर्गत गटबाजीमुळे कोमेजण्याच्या मार्गावर

0

शहादा । केंद्रासह राज्यात सत्तेत असलेल्या भापता नंदुबार जिल्ह्यांत मात्र अंतर्गत गटबाजीमुळे त्रस्त झालेला दिसत आहे. यामुळे कार्यकर्त्यांध्ये सगळीकडे नाराजीचा सुरू उमटत असून कार्यकर्त्यांमध्ये कोणत्या नेत्याच्या सहवासात काम करावे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ह्या अंतर्गत गटबाजीमुळे जिल्हाभरात विकासकामांना मात्र निश्‍चितच खीळ बसली आहे. आमदार-खासदारांना निवडून दिल्याने विकास कामे होत नाहीत म्हणून नागरिकांमध्ये सुद्धा नाराजीचा सूर उमटत आहे.केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ह्यांच्यामुळे नागरिकांच्या आशा मोठ्या प्रमाणात पल्लवीत झाल्या होत्या. जिल्ह्यावासीयांनी कमळाला प्रथम पसंती देऊन जिल्ह्यांत एक खासदारासह दोन भाजपा आमदार व एक शहाद्याचे नगराध्यक्ष पद भरघोस मतांचे दान देऊन भाजपाच्या पदरात टाकले. निवडणुकीनंतर संपूर्ण जिल्हा भाजपामय झाल्याने सर्वांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण दिसूत येत होते. काँग्रेस-राष्ट्रवादी यांना कंटळलेल्या नागरिकांनी भाजपाकडून मोठी विकासकामांची अपेक्षा ठेवली होती. मात्र, जिल्ह्यांत तीन वर्ष उलटूनही हवा तो विकास झालेला नसल्याचे चित्र आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून नागरिकांमध्ये नाराजी पहावयास मिळत आहे. नाराजी असली तरी रस्त्यांवरील खड्ड्यांना निमुटपणे सामोरे जात मार्गक्र्रमण करीत आहेत. यामागे त्यांनीच आमदार-खासदारांना निवडून दिलेले असल्याने आपली कैफीयत कोठे मांडावी याबाबत त्यांच्यांत संभ्रम आहे. रस्त्यांसोबतच जिल्ह्यांत इतर मुलभूत प्रश्‍नांचा जसे आरोग्य, शिक्षणाचा बोजवारा उडलेला पहावयास मिळत आहे. सातपुड्यांसह, सपाटीवरही आजही आरोग्याचा प्रश्‍न वारंवार सतावत आहेत. कुपोषण, सिकलसेल, अ‍ॅनिमीया ह्या सारख्यांच्या आजारांनी नागरिक त्रस्त झालेले आहेत. आजही याभागांमध्ये शासनाचे वरिष्ठ अधिकारी महिनो महिने येत नसल्याने नागरिकांना आरोग्याचा प्रश्‍नांना सामोरे जावे लागत आहे. शिक्षणाचा प्रश्‍न दुर्गम भागासह शहरी भागातही जटील झाला असून जिल्हा परिषदेच्या माराठी माध्यामांच्या शाळांची अवस्था खुपच बिकट झाली आहे. खाजगीकरणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कमी होतांना दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या काही शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्यात अपूर्ण पडत असल्याने जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या प्रत्येक वर्षी कमी कमी होत आहे.जिल्ह्यांत एक खासदार व दोन आमदार भाजपाचे असून देखील भारतीय जनता पक्षात अंतर्गत गटबाजीमुळे आपसात मतभेद क्षणागणिक वाढत आहेत. ह्या मतभेदांमुळे जिल्ह्यांचा विकास खुंटला आहे. गटबाजीमुळे कार्यकर्त्यांची गळचेपी होत आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये आमदार-खासदार यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सार्वजनिक होतांना दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांत भाजपाचे आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार उदेसिंग पाडवी व खासदार डॉ. हिना गावित यांचे उल्लेखनीय असे कोणतेच कार्य जिल्हाभरात झालेले ऐकवत नाही. खासदार डॉ. हिना गावित यांनी शहादा तालुक्यांतील कहाटूळ गाव हे ‘आदर्श गाव’ योजनेअंतर्गत दत्तक घेतले होते.

खासदार डॉ. गावित यांच्या दत्तक गावाला आजही पिण्याचा प्रश्‍न सतावत आहे. पाण्यासाठी गावविहीर तासंतास ताटकळत पाणी भरावे लागत आहे. सुमारे आठ कोटींची कामे मंजूर झाली असून देखील खासदार डॉ. हिना गावित यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे अर्धवट अवस्थेत असल्याचे बोलले जात आहे. आज कहटुळ गावात डॉ. हिना गावित व आमदार विजयकुमार गावित या दोहांबद्दल नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. डॉ. हिना गावित यांनी कहाटूळ गावाच्या विकासकरण्याचे जर खरोखरच मनावर घेतले असते तर दोन वर्षांपुर्वीच आदर्श गाव म्हणून कहाटूळ गाव नावलौकीकास आले असते. आजही कहाटूळ गाव सुविधांपासून वंचित आहे. तर डॉ. विजयकुमार गावित व आमदार उदेसिंग पाडवी यांच्यातील कलगीतुर्‍यांमुळे जिल्ह्यांतील अधिकार्‍यांवर वचक राहिलेला नसल्याने विकास कामे खोळंबली असली तरी शासनाच्या योजना ह्या कागदावरच राहिल्या आहेत. नागरिकांपर्यंत केंद्राच्या तसेच राज्यांच्या योजना पोहचल्या नाहीत. कार्यकर्त्यंना गट, गण आणि प्रभागातील नागरिकांच्या समस्यांना सामोरे जाण्यास जिकरीचे झाले आहे. शहादा शहरात भाजपाला प्रथमच यश आल्याने विकासकामांना गती येईल अशी अपेखा सर्वसामान्य नागरिक करू लागले होते. मात्र, निवडणूकीनंतर भाजपाकडून नागरिकांची घोर निराशा झाल्याचे दिसत आहे. रस्त्याची बिकट अवस्थेसह आरोग्य, स्वच्छता, शिक्षण असे अनेक प्रश्‍न डोकेवर काढत आहेत. गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून शहरात सगळीकडे अस्वच्छता, नालेसफाई अभावी, दुर्गंधीयुक्त पाणी यामुळे रोगराई पसरण्याच्या शक्यता आहे.

शहरात ठिकठिकाणी कचर्‍यांचे ढिग पहावयास मिळत आहेत. सफाईंवर लाखों रूपये प्रत्येक महिन्याला खर्चूनही शहरात स्वच्छता दिसत नाही. फिल्टर पाण्याचे स्वप्न दाखऊन आजही खराब पाणी नागरिकांना भरमसाठ पाणीपट्टी आकारून पाजले जात आहे. गल्लीपासुन दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता असूनही भाजपाच्या अंतर्गत गटबाजीमुळे शहरासह ग्रामीण भागाचा विकास खुंटला असलातरी कार्यकर्ते मात्र सोयीचे राजकारण करून आपल्या नेत्यांकडून स्वतःसाठी मलिदा घेत आहेत. हे कार्यकर्ते स्वतःच्या सोयीनुसार दुकान थाटून बसले असून नागरिकमात्र वार्‍यांवर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
भरत शर्मा, शहादा – 9156293031