भाजपाचे खासदार स्वार्थी

0

नवी दिल्ली । भाजप मधील दलित खासदार स्वर्थी आणि ढोंगी आहेत, असा घणाघात बसपाच्या नेत्या मायावती यांनी केला आहे. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमधील बदलांविरोधात झालेल्या भारत बंदमधील हिंसाचारासाठी भाजपा जबाबदार असून हा बंद यशस्वी झाल्याने भाजपा घाबरला आहे. त्यामुळेच आता दलितांचे शोषण सुरु झाले आहे. दलित समाजातील निरपराध तरुणांना खोट्या केसेसमध्ये अडकवले जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

भाजपातील दलित खासदार हे स्वार्थी असल्याची टीकाही त्यांनी केली.बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत भाजपावर टीका केली. आता दलितांचे शोषण सुरु झाले असून तरुणांना खोट्या केसेसमध्ये अडकवले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. दलित समाजाने याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करावी, असे त्या म्हणाल्या.