जळगाव – जळगाव शहर महापालिकेत अडीच वर्षानंतर सत्तांतर झाले आहे. भाजपाचे २७ बंडखोर नगरसेवक आणि ओवेंसीच्या एमआयएम पक्षाच्या तीन नगरसेवकांच्या मदतीने शिवेसेनेने महापालिकेवर सत्ता काबीज करीत भगवा फडकविला आहे. महापौर पदासाठी शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन यांना ४५ तर भाजपाच्या उमेदवार प्रतिभा चंद्रकांत कापसे यांना ३० मते मिळाली. १५ मतांनी शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन या महापौर म्हणून विजयी झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विशेष सभेत केली.