जळगाव । भाजपा महानगरतर्फे आज शहरात अभिप्राय मोहिम राबविण्यात आले. यासाठी जलसंपदामंत्री ना.महाजन यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी स्टॉल लाावून येणार्या व जाणार्या नागरिकांच्या अभिप्राय नोंदवून घेण्यात आले. यात काही नकारात्मक तर काहींनी नोटबंदीचा निर्णय खरच चांगला असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी आजचा दिवस हा ‘नोट बंदी’ संदर्भात विरोध करत आपले प्रखर मत व्यक्त केले. संपर्क कार्यालय कोर्ट परिसरात असल्याने सकाळची चाकरमान्यांची, शाळेतील विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची वेळ असल्याने वाहतूकीत थोडा अडथळा निर्माण झाला होता.
यांची होती उपस्थिती
अभिप्राय शिबिरात सुशिल हासवाणी, प्रा. जीवन अत्तरदे, सुनिल माळे, दत्तात्रय जाधव, सुरेश गोयर, सुहास जोशी, केशव नारखेडे, भाजपा महिला पदाधिकारीत कविता सपकाळे, ममता जोशी, रेखा कुलकर्णी, नितू परदेशी, ज्योती राजपूत, जयश्री पाटील, छाया पाटील, लता पाटील, अतुलसिंह हाडा, लक्ष्मण धनगर, तृप्ती पाटील, तेजस जोशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.