भाजपाच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने फटाके फोडून केला जल्लोष

0

मुक्ताईनगरासह वरणगावात पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश महाजन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

मुक्ताईनगर- जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची वर्णी लागल्यानंतर भाजपाचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या स्थानिक शिवसेना पदाधिकार्‍यांनी प्रवर्तन चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला तसेच व नामदार महाजन यांच्या शुभेच्छांबद्दल वार्ताफलक चौकात लावल्याने शहरात या विषयाची जोरदार चर्चा राहिली. एकीकडे माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसेंना मंत्री पद मिळेल की काय ? अशी चर्चा भाजप कार्यकर्ते सोशल मीडियात करीत असलेतरी दुसरीकडे महाजनांची मात्र सरशी झाल्याचे दिसून आले. त्यातच मुक्ताईनगरात स्थानिक भाजपाच्या गोटातून आनंदोत्सव साजरा केला गेला नसलातरी शिवसेना पदाधिकार्‍यांनी प्रवर्तन चौकात जमून मंत्री महाजनांच्या अभिनंदनाचे फलक लावत फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भविष्यातील राजकारणाची ही तर नांदी नाही ना? असादेखील प्रश्‍न उपस्थित यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी तालुकाप्रमुख छोटू भाई, सुनील पाटील, अफसर खान, राजेंद्र हिवराळे, राजेंद्र तळेले, विठ्ठल तळेले, प्रफुल्ल पाटील, गणेश डांगे, प्रवीण चौधरी, योगेश काळे, वसंत बनवले, बबलू वंजारी, रोहिदास शिरसाट, शुभम तळेले, शुभम शर्मा, पवन सोनवणे, पंकज पोळी, जीवराम कोळी, पप्पू मराठे, गौरव तळेले यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

वरणगावात कट्टर समर्थकांनी केला जल्लोष
वरणगाव-
जलसंपदा मंत्री महाजन यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांचे खंदे व कट्टर समर्थक व नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. बसस्थानक चौकात जोरदार फटाक्यांची आतशबाजी करून ढोलताश्यांच्या गजरात नृत्य करून निवडीचे स्वागत करण्यात आले

यांची होती उपस्थिती
नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख शेख युसूफ, नगरसेविका माला मेंढे, भाजपा ज्येष्ठ नेते अल्लाउद्दीन शेठ, नारायण सेठ जैस्वाल, माजी उपसरपंच साजीद कुरेशी, नगरसेवक ईरफान भाई, समाजसेवक संजू कोलते पिंजारी, माजी सरपंच सुकलाल धनगर, माजी उपसरपंच शेख सईद शेख भिकारी, माजी शहराध्यक्ष प्रकाश चौधरी, हनुमान व्यायाम शाळेचे नामदेव पहेलवान, एकनाथ पहेलवान, सुभाष पोतदार, उपजिल्हा संघटक विलास मुळे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ज्ञानेश्वर घाटोळे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अजय पाटील, भाजपा नेते संजयकुमार जैन, शामराव धनगर, भाजपा शहरप्रमुख सुनील माळी, वॉर्ड अध्यक्ष हितेश चौधरी, कुंदन माळी, तेजस जैन लखन माळी, आकाश निमकर, जय चांदणे, पिंटू गजानन पाटील, बाळू मोते, संजय सोनार, अनंतराव माळी, महेश माळी, टिनू माळी, संदीप माळी, डी.के.दादा खाटीक, शोएब खाटीक, सोनू कुरेशी, शंकर पहेलवान पवार, प्रा.प्रशांत तायडे, दीपक संजय चौधरी, कृष्णा पूजारी, अरुण बावणे, भुरा भोई, वरणगाव शहरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.