उरण कॉग्रेसच्या बैठकीत रवींद्र सावंत यांचा दावा
उरण । राज्यात आणि देशात ज्यांचे सरकार आहे त्या भाजपाचे आता खर्या अर्थाने बुरे दिन सुरू झाले असून सध्याच्या युगात पूर्वी कॉग्रेसवर सडकून टीका करणारे जवळजवळ ९० टक्के नेटकरी आजकाल फसव्या भाजपा सरकारवर टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे या पुढच्या काळात कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सतर्कतेने पक्षाचे कामकाज करीत राहावे आपले दिवस येणार म्हणजे नक्की येणार असा विश्वास कॉग्रेसचे निरीक्षक रवींद्र सावंत यांनी उरण येथे व्यक्त केला आहे. कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकारी निवडीसाठी बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कामगार नेते महेंद्र घरत, तालुका अध्यक्ष जे डी जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पादाधिकारी निवडीचा सर्वाधिकार प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांना देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. बैठकीत कामगार नेते महेंद्र घरत आणि रवींद्र सावंत यांनी फेकूचंद भाजपा सरकारवर सडकून टीका केली. वाढती महागाई आणि ज्या विकासाच्या नावाखाली फसवून भाजपावाल्यानी मते मागितली तो विकास सध्या कुठे मेलाय असा सवाल या निमित्ताने करण्यात आला असून फेकूचंद मोदी सध्या जी धडाधड उद्घाटने करीत फिरत आहे टी कामे प्रत्यक्षात कॉग्रेसची आहेत हे आता सामान्य जनताच बोलत असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले.
सेना आता आंदोलने करू लागली
राज्यात आणि देशात सत्तेत सहभागी असलेली शिवसेना सुद्धा आता भानावर आली असून शिवसेना आता रस्त्यावर उतरून आंदोलने करू लागली आहे याचा अर्थच राज्यातील आणि देशातील भाजपा सरकारचा फुगा फुटू लागला असून आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उरण तालुक्यात आपल्याला नक्कीच चागले यश येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी कॉग्रेसचे कार्यालय कार्यकर्त्यांनी खचाखच भरून गेला होता अनेक कार्यकर्त्यांना बसायला जागाही उपलब्ध न झाल्याने उभे राहून कार्यकर्त्यांना या बैंठकीचा आनंद घ्यावा लागला. यावेळी पक्षाच्या पदाधिकारी निवडीसाठी इच्छूकांनी आपली नावे बंद लिफाफ्यात देण्यात यावीत आणि ती सर्व नावे प्रदेश अध्यक्षांना पाठविण्यात येतील असे यावेळी ठरविण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष जे डी जोशी यांनी जे राहिलेत तेच खरे मावळे असून या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावरच उरण तालुक्यात कॉग्रेस पक्षाची घोड दौड सुरू असल्याचे यावेळी स्पस्ट केले.