ठाणे: भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागे काही दिवसांपूर्वी एका महिला नगरसेविकेने या आमदारावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्याविरोधात त्यांनी तक्रार त्यांनी कोकण महानिरीक्षकांकडे केली होती. त्याची दखल घेऊन मीरा-भाईंदर पोलिसांनी गुरुवारी रात्री ३ वाजून ३५ मिनिटांनी मेहता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नरेंद्र मेहता यांच्यापासून माझ्या संपूर्ण कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार पीडित नगरसेविकेनं केली होती. ‘मेहता यांच्याशी माझं लग्नही झालं असून त्यांच्यापासून मला एक मुलगाही आहे. १९९९ पासून ते २०२० पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन माझं लैंगिक शोषण केलं. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी माझा वापरही करून घेतला होता. माझ्याप्रमाणेच मेहता यांनी अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे, असा आरोप तिनं केला आहे.
याबाबत पीडित नगरसेविकेनं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडंही तक्रार केली होती. मात्र, त्याकडं दुर्लक्ष केलं गेलं त्यांचं म्हणणं होतं. पक्षाकडून न्याय न मिळल्यानं अखेर तिनं पोलिसांकडे धाव घेतली होती. मेहता यांच्यावरील आरोपांवरून महाविकास आघाडी सरकारनंही विधिमंडळात भाजपला घेरलं होतं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्वत: हा मुद्दा उचलला होता. त्यामुळं भाजपची मोठी कोंडी झाली होती.