भाजपाच्या विजयाचा सर्वत्र जल्लोष

0

भुसावळ । उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अभुतपुर्व यशाचा ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला निवडणूकीचा निकाल जाहीर होताच भुसावळ येथे आमदार संजय सावकारे यांच्या कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. तर बाजारपेठ पोलीस स्थानक चौकात उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. याप्रसंगी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपा शहराध्य पुरुषोत्तम नारखेडे, प्रमोद नेमाडे, राजेंद्र आवटे, मनोज बियाणी, प्रमोद सावकारे, बोधराज चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रावेर शहरात भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून जनतेला पेढे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश धनके, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष, पद्माकर महाजन, मिलिंद वायकुळे, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, सरचिटणीस वासुदेव नरवाड़े, प्रवीण पाचपोहे, अतुल महाजन, रविंद्र पाटील, लखन महाजन, मनोज श्रावगे, सुधाकर पारधी, पी.के. महाजन, सुरेश तावळे, नगरसेवक यशवंत दलाल, पप्पूशेट गिनोत्री, सुरेश चिंधु पाटील आदी भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थीत होते.