मुक्ताईनगर। जैन मुनी आचार्य नयनपद्मस्वामी यांच्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून जैन बांधवांच्या भावना दुखावल्याने या प्रकाराचा भाजपाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. यासंदर्भात मुक्ताईनगर तालुका भाजपाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. खासदार राऊत यांनी आचार्य नयनपद्म स्वामी व जैन समाजबांधवांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली.
निवेदन देताना यांची होती उपस्थिती
याप्रसंगी निवेदन देताना तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, प्रदेश सदस्य अशोक कांडेलकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश ढोले, सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, जिल्हा चिटणीस राजेंद्र माळी, योगेश कोलते, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे, उपसभापती प्रल्हाद जंगले, ताहेर खान पठाण, तालुका सरचिटणीस सतीष चौधरी, डॉ. बी.सी. महाजन, संदीप देशमुख, जिल्हा परिषद सदस्य नीलेश पाटील, जयपाल बोदडे, गुणवंत पिवटे, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, सुनील काटे, सरपंच ललित महाजन, मनोज तळेले आदी उपस्थित होते.